संतोष कानडे
ज्योतिषशास्त्रानुसार मानवाप्रमाणेच पाळीव प्राण्यांचीही जन्मतारीख आणि वेळेनुसार रास काढता येते.
याला पेट ॲस्ट्रॉलॉजी म्हणतात. प्राण्यांमध्ये मानवाप्रमाणेच १२ राशी असतात: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन.
या राशीचे प्राणी अत्यंत उत्साही, धाडसी, खेळकर आणि नेहमी पुढे राहणारे असतात.
हे प्राणी शांत, खादाड, सुस्त आणि घरात एकाच जागी विश्रांती घेणे पसंत करणारे असतात.
अत्यंत जिज्ञासू, चपळ आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची आवड असणारे हे प्राणी असतात.
आपल्या मालकाशी अत्यंत भावनिक नाळ जोडलेले, लाजाळू आणि अधिक प्रेम व काळजी मागणारे प्राणी असतात.
रुबाबदार, गर्विष्ठ, घरातील सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणारे आणि स्वतःला राजा समजणारे असतात.
कन्या राशीचे प्राणी शिस्तप्रिय आणि स्वच्छतेची आवड असणारे, तर तूळ राशीचे प्राणी अतिशय मैत्रीपूर्ण व शांत स्वभावाचे असतात.
वृश्चिक राशीचे प्राणी मालकाशी अत्यंत एकनिष्ठ पण अनोळखी व्यक्तींबाबत संशयी असतात; तर धनु राशीचे प्राणी भटके व साहसी असतात.
मकर राशीचे प्राणी आज्ञाधारक, कुंभ राशीचे स्वतंत्र व वेगळ्या स्वभावाचे, तर मीन राशीचे प्राणी अत्यंत संवेदनशील आणि अंतर्ज्ञानी असतात.