सकाळ डिजिटल टीम
अंडी हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे आनेकांच्या सकाळच्या नाश्त्यात अंड्यांचा समावेश असतो. पण खरच अंड्यांना एक्सपायरी असते का? काय आहे सत्य जाणून घ्या.
Egg Expiry Facts
sakal
बाजारात मिळणाऱ्या अंड्यांच्या क्रेटवर किंवा बॉक्सवर 'Pack Date' किंवा 'Expiry Date' असते. साधारणपणे अंडी काढल्यापासून २८ ते ३० दिवसांपर्यंत ती खाण्यायोग्य मानली जातात.
Egg Expiry Facts
sakal
अंडे ताजे आहे की नाही हे ओळखण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात अंडे टाका. जर अंडे तळाला आडवे बसले तर ते ताजे आहे. जर ते उभे राहिले तर ते थोडे जुने आहे, पण खाण्यायोग्य आहे. मात्र, जर अंडे पाण्यावर तरंगले, तर ते पूर्णपणे खराब झाले असून ते त्वरित फेकून द्यावे.
Egg Expiry Facts
sakal
अंडी जसजशी जुनी होतात, तसतसे त्यांच्या कवचातून पाणी बाष्पीभवनाद्वारे बाहेर पडते आणि आत हवेची पोकळी वाढते. त्यामुळेच जुनी अंडी पाण्यावर तरंगतात.
Egg Expiry Facts
sakal
अंडे फोडल्यानंतर जर त्याला उग्र किंवा कुबट वास येत असेल, तर ते अंडे खराब झाले आहे असे समजावे. ताजे अंडे गंधहीन असते.
Egg Expiry Facts
sakal
ताजे अंडे फोडल्यावर त्याचा पिवळा बलक (Yolk) गोलाकार आणि उंच असतो, तर पांढरा भाग घट्ट असतो. अंडे जुने असल्यास पिवळा बलक पसरतो आणि पांढरा भाग पाण्यासारखा पातळ होतो.
Egg Expiry Facts
sakal
एक्सपायरी डेट संपलेली किंवा खराब झालेली अंडी खाल्ल्याने 'साल्मोनेला' नावाच्या बॅक्टेरियामुळे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होऊ शकते. यामुळे जुलाब, उलटी आणि ताप येऊ शकतो.
Egg Expiry Facts
sakal
कच्च्या अंड्यापेक्षा उकडलेले अंडे लवकर खराब होते. उकडलेले अंडे फ्रिजमध्ये फक्त ७ दिवसांपर्यंतच चांगले राहते.
Egg Expiry Facts
sakal
अंडी नेहमी अशा ठिकाणाहून खरेदी करा जिथे साठा जुना नसेल. शक्य असल्यास स्थानिक पोल्ट्री फार्मवरून ताजी अंडी घेण्याला प्राधान्य द्यावे.
Egg Expiry Facts
sakal
muskmelon smoothie
Sakal