साखर अन् दुधाशिवाय बनवा थंडगार खरबूज स्मूदी!

Aarti Badade

उन्हाळ्यातील 'हेल्दी' पर्याय

उन्हाळ्यात थंडगार पेये हवी असतात, पण साखर आणि दुधाशिवाय काहीतरी आरोग्यदायी शोधत असाल, तर ही खरबूज स्मूदी तुमच्यासाठी बेस्ट आहे.

muskmelon smoothie

|

Sakal

आवश्यक साहित्य

या स्मूदीसाठी तुम्हाला लागेल: पिकलेला खरबूज, ओला नारळ, वेलची, खजूर (बिया काढलेले), पाणी, बर्फ आणि भिजवलेला सब्जा.

muskmelon smoothie

|

Sakal

खरबुजाची तयारी

सर्वात आधी अर्धा मध्यम आकाराचा पिकलेला खरबूज घ्या. त्यातील बिया काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या.

muskmelon smoothie

|

Sakal

खजूर

यात साखरेऐवजी ३-४ बिया काढलेले खजूर वापरा. यामुळे स्मूदीला नैसर्गिक गोडवा आणि पौष्टिकता मिळते.

muskmelon smoothie

|

Sakal

नारळाचा वापर

मिक्सरच्या भांड्यात खरबुजाचे तुकडे, ओला किसलेला नारळ (किंवा नारळाचे दूध), २ वेलची आणि खजूर एकत्र घ्या.

muskmelon smoothie

|

Sakal

स्मूदी तयार करा

यात एक मोठा ग्लास पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरमध्ये अगदी गुळगुळीत (Smooth) होईपर्यंत व्यवस्थित वाटून घ्या.

muskmelon smoothie

|

Sakal

सर्व्ह करण्याची पद्धत

एका ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाका आणि त्यावर ही स्मूदी ओता. वरून भिजवलेल्या सब्जाच्या बिया आणि आवडीचा सुकामेवा टाका.

muskmelon smoothie

|

Sakal

आरोग्यासाठी वरदान

ही स्मूदी केवळ चविष्ट नाही, तर यात फळ आणि नैसर्गिक घटक असल्याने ती ऊर्जा देते आणि पचनासाठीही हलकी असते.

muskmelon smoothie

|

Sakal

कॉफीमध्ये 1 चमचा तूप टाकून पिल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Ghee coffee benefits

|

Sakal

येथे क्लिक करा