संतोष कानडे
मासे पाण्यात राहतात, त्यामुळे ते लघवी करीत नाही, असं तुम्हाला वाटलं असेल. परंतु सर्व मासे लघवी करतात.
शरीरातील कचरा बाहेर टाकण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असते. मात्र माशांची लघवी करण्याची पद्धत वेगळी असते.
काही मासे थेट किडनीद्वारे लघवी करतात तर काही मासे कल्ल्यांद्वारे शरीरातील कचरा बाहेर टाकतात.
माशांची लघवी थेट पाण्यात मिसळते. गोडं पाणी समुद्री पाण्यातील माशांच्या लघवी करण्याच्या प्रक्रियेत फरक असतो.
गोड्या पाण्यातील मासे जास्त लघवी करतात, कारण ते जास्त पाणी शरीरात घेतात.
या तुलनेत समुद्रातील मासे कमी लघवी करतात.कारण त्यांना पाणी टिकवून ठेवावं लागतं.
लघवीतून मीठ आणि इतर अपायकारक पदार्थ बाहेर टाकले जातात. ही प्रक्रिया शरीरालीत पाणी आणि मिठाचं प्रमाण संतुलीत ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे.
सर्वच जीव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकत असतात.