वाघ लघवी का करतो? जंगलाला देतो 'हे' 5 मेसेज

संतोष कानडे

वाघ

इतर प्राणी जसे शरीरधर्म म्हणून लघवी करतात, तसं वाघ करत नाही. तो त्याच्या लघवीतून जंगलाला ५ वेगवेळे मेसेज देत असतो.

टेरेटरी

सर्वात महत्त्वाचं आहे टेरेटरी. वाघ आपल्या लघवीतून आपली हद्द म्हणजे टेरेटरी निश्चित करत असतो. त्यामुळे इतर वाघांना त्याची जाणीव होते.

लिंग

दुसरं म्हणजे वाघ आपल्या लघवीतून स्वतःचं लिंग, वय सांगत असतो. दुसऱ्या वाघांना किंवा प्राण्यांना त्याच्या ताकदीचा यातून अंदाज येतो.

प्रजनन

तिसरी बाब म्हणजे वाघाच्या किंवा वाघिणीच्या लघवीतून ते प्रजननासाठी तयार आहेत की नाही, हे सांगतात. नराला किंवा मादीला हे वासावरुन कळतं.

प्राणी

चौथी गोष्ट कळते ती, लघवी किती ताजी आहे, यावरुन वाघ नुकताच इथे होता की किती वेळेपूर्वी निघून गेलाय, हे इतर वाघांना किंवा प्राण्यांना कळून येतं.

लघुशंका

पाचवी गोष्ट म्हणजे ज्या वाघाने लघुशंका केली आहे, तोच पुन्हा आपली हद्द कन्फर्म करण्यासाठी आपल्या लघुशंकेचा वास घेत पुन्हा तिथेच लघुशंका करतो.

हद्दी निश्चिती

वाघ हे दररोज रात्री आपल्या हद्दींची निश्चित किंवा अधोरेखित करत असतात. इतर वाघांना त्याच्या हद्दीत जाण्याची मुभा नसते. तसं झालं तर दोन वाघांमध्ये संघर्ष निर्माण होतो.

लघवी

लघवी म्हणजे वाघांची कम्युनिकेशची एक प्रणाली आहे. यातून वाघ अनेक गोष्टी साध्य करत असतात. वाघ कळपाने न रहता एकटेच टेरेटरी सांभाळत असतात.

कळप

इतर प्राणी मात्र आपल्या कळपांसोबत राहून आपली हद्द सांभाळतात. जंगलाचा राजा म्हणवणारा सिंहदेखील कळपानेच राहून ऐटीत आयती शिकार खातात.

सरस्वती पूजनाने फर्मान काढणारा इराणी मुस्लिम बादशहा

<strong>येथे क्लिक करा</strong>