Anushka Tapshalkar
पाहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुदलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जैश, लश्कर व हिज्बुलच्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केली. या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं.
भारतीय संरक्षण मंत्रालयाने रात्री 1:44 वाजता निवेदन जारी करत ही कारवाई जाहीर केली. ही ऑपरेशन अत्यंत गोपनीय आणि अचूक पद्धतीने पार पाडण्यात आली.
या हल्ल्यासाठी SCALP या डीप-स्ट्राइक क्रूज मिसाइलचा वापर करण्यात आला. ही मिसाइल हवा वरून जमिनीवर अचूक मार करू शकते.
माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी या ठिकाणी सुमारे 900 पेक्षा अधिक दहशतवादी उपस्थित होते.
अशा ऑपरेशन्ससाठी 'पॅरा एसएफ', 'गरुड़ कमांडोज' सारख्या विशेष फोर्सेसना काम दिलं जातं. हे जवान विशेष प्रशिक्षणप्राप्त आणि अत्यंत कुशल असतात.
भारतीय लष्करामार्फत अनेक मिशन्स केले जातात, त्यासाठी अनेक सैनिकांची पोस्टिंग होते. अशा उच्च-जोखमीच्या मिशन्ससाठी सैनिकांना स्पेशल अलाउंस दिला जातो. तो त्यांच्या पोस्टिंग व मिशनच्या धोक्याच्या स्तरावर अवलंबून असतो
स्पेशल ऑपरेशन्समध्ये भाग घेणाऱ्या जवानांना पुढे प्रमोशनमध्येही फायदा होतो. त्यांना रँकमध्ये पदोन्नती मिळते आणि त्यानुसार अतिरिक्त फायदेही मिळतात.
हे सर्व फायदे व सवलती रेग्युलर पोस्टिंगवर असलेल्या सामान्य सैनिकांपेक्षा वेगळे आणि अधिक असतात, जे त्यांच्या कर्तृत्वाला मान्यता देतात.