Aarti Badade
भारत-पाक युद्धाच्या काळात ताजमहालला रडारपासून वाचवण्यासाठी 15 दिवस झाकण्यात आलं होतं.
ताजमहालची उंची आणि सफेद संगमरवरी रचना रडारवर सहज दिसत होती. त्यामुळे खेरिया एअरबेसचा अंदाज लावण्यासाठी शत्रू ताजमहालचा उपयोग करू शकत होते.
ताजमहालला हिरव्या रंगाच्या गोणपाट व ताडपत्रीनी झाकलं गेलं. त्याभोवती झाडाझुडपं लावून जंगलासारखा आभास निर्माण करण्यात आला.
पाकिस्तानच्या विमानांनी आग्र्याच्या रनवे वर बॉम्बफेक केली. रनवेवर मोठ्ठा खड्डडा पडला होता.
सरकारी आदेशानंतर ताजमहाल झाकण्याचं काम त्वरित सुरू करण्यात आलं.
विभागाकडील गोणपाट हिरव्या रंगात रंगवले गेले. टेंटवाल्यांकडून ताडपत्री मागवली गेली आणि बाजारातून जुने कापडही खरेदी केले गेले.
बांबू, झाडांच्या फांद्या, झुडुपं वापरून स्मारकाला झाकलं गेलं.अकबराचा मकबरा व अन्य स्मारकांमधून झाडं आणली गेली.
या संरक्षणासाठी जवळपास ₹20,500 खर्च झाले होते. त्याकाळात ही मोठी रक्कम मानली जात होती.
युद्ध 16 डिसेंबरला संपलं, पण खबरदारी म्हणून ताजमहाल 2 दिवस अधिक बंद ठेवलं गेलं.