मृत्यूनंतरही नखे आणि केस वाढत राहतात का?

Mansi Khambe

व्यक्तीचा मृत्यू

व्यक्तीच्या मृत्यूनंतर केस आणि नखे वाढणे थांबते. तथापि, त्यांच्या सभोवतालची त्वचा कोरडी होऊन मागे सरकते, ज्यामुळे केस आणि नखे अधिक उघडे पडतात आणि ते लांब दिसू लागतात.

केस आणि नखांची वाढ

केस आणि नखे त्यांच्या मुळांजवळील पेशींच्या एका विशिष्ट गटापासून विकसित होतात. नखांमध्ये ज्या भागात वाढ होते, त्या भागाला मॅट्रिक्स म्हणतात.

मॅट्रिक्स

मॅट्रिक्समध्ये, पेशी विभाजित होतात आणि जुन्या पेशींना पुढे ढकलतात. जसजशा या पेशी वाढीच्या भागापासून दूर जातात, तसतसे केराटिनच्या निर्मितीमुळे त्या कठीण होतात.

रक्तभिसरण प्रक्रिया

मृत्यूनंतर जेव्हा हृदयाचे ठोके थांबतात, तेव्हा शरीराला ऑक्सिजन पुरवणारी रक्तभिसरण प्रक्रिया देखील थांबते. यामुळेच नवीन केस आणि नखे तयार होण्याची प्रक्रिया थांबते.

त्वचेचे आकुंचन

मृत्यूनंतर, शरीरातील द्रवाचा पुरवठा थांबतो, तर उतींमधून पाण्याचे बाष्पीभवन होत राहते. त्वचा आणि इतर मऊ उतींमधील ओलावा कमी झाल्यामुळे, त्या आकुंचन पावतात आणि मागे सरकतात.

शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन

हा बदल बोटांच्या टोकांभोवती पाहता येतो. नखाच्या मुळाशी असलेली त्वचा, क्युटिकलसह, कोरडी झाल्यामुळे मागे सरकते. यामुळे नखाचा अधिक भाग दिसू लागतो.

परिणाम

असाच परिणाम चेहऱ्याच्या आणि टाळूच्या त्वचेवरही होऊ शकतो. चेहऱ्याची त्वचा आकुंचन पावल्यामुळे, दाढीचे केस गालांपासून अधिक बाहेर आलेले दिसू शकतात. पण वास्तविक पाहता, केस लांब वाढत नाहीत

काही तासांतील बदल

पहिल्या ० ते ५ मिनिटांत, हृदय आणि मेंदू काम करणे थांबवतात, ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो आणि पेशी विभाजन थांबते. परिणामी, केस आणि नखांची प्रत्यक्ष वाढ देखील थांबते.

त्वचेचे आकुंचन

१२ ते २४ तासांच्या आत, शरीरातील ओलावा हळूहळू कमी होतो, परिणामी नखांच्या मुळाशी असलेली त्वचा आकुंचन पावू लागते, ज्यामुळे नख पूर्वीपेक्षा लांब दिसू लागते.

विघटन प्रक्रिया

त्वचेचे आकुंचन २४ ते ७२ तासांच्या आत सर्वोच्च पातळीवर पोहोचते. येथूनच शरीराच्या विघटन प्रक्रियेची सुरुवात होते. जसजशी त्वचा आणखी आकुंचन पावते, तसतसे नखे आणि दाढीचे पूर्वी लपलेले भाग दिसू लागतात.

Changes in body after death

|

ESakal

लांबी

या काळात, केस आणि नखे वाढत असल्याचा भास निर्माण होतो, मात्र प्रत्यक्षात त्यांची लांबी बदललेली नसते.

Microsoft Outageमुळे किती नुकसान झाले? कंपनीचा एका दिवसात किती व्यवसाय होतो?

Microsoft lose during outage

|

ESakal

येथे क्लिक करा