नखांच्या पांढऱ्या डागांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; असू शकतात 'या' गंभीर आजारांचे संकेत!

Anushka Tapshalkar

नखांवरील पांढरे डाग गंभीर आजारांचे संकेत

नखांवर पांढरे चट्टे दिसणे ही फक्त सौंदर्याची समस्या नाही, तर कधीकधी लिव्हर, किडनी किंवा हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंध नाही

बहुतेक लोकांना वाटते की पांढरे डाग कॅल्शियम कमी असल्यामुळे होतात, पण प्रत्यक्षात हे आजार किंवा नखांची इजा मुळे होते.

शरीरातील बदल नखांवर दिसतात

नखांच्या पेशींमध्ये हवेचे बुडबुडे किंवा पांढरट प्रथिने जमा होऊन नखांमध्ये पांढरे डाग दिसतात.

रसायने आणि बुरशीजन्य संसर्गाचा प्रभाव

नेलपॉलिश, रिमूव्हर किंवा नेल हार्डनरमधील रसायनांमुळे नख पांढरे पडू शकतात; तसेच बुरशीजन्य संसर्गामुळे देखील बदल होतो.

विशिष्ट आजारांचे संकेत

  • संपूर्ण नख पांढरे → लिव्हरचे आजार

  • पांढरे डाग किंवा ठिपके → किडनीचे आजार

  • नखांच्या कडा पांढऱ्या/गुलाबी → हृदयविकाराचा धोका

आहाराचा परिणाम

झिंक, विटामिन सी, दूध, दही, कडधान्ये, फळे, पालेभाज्या यांचा समावेश असलेला आहार नखांना मजबूत ठेवतो.

नखांची योग्य काळजी

नेलपॉलिशचा अतिवापर टाळावा, नखांवर नियमित मॉइश्चरायझर किंवा खोबऱ्याचे तेल लावावे आणि नखांना काहीही दुखापत झाल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुमचे केस गळतात

hair fall problem vitamin deficiency

|

sakal

आणखी वाचा