सकाळ डिजिटल टीम
सध्या सोशल मीडियावर पाण्यात हळद टाकण्याचा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. याचे रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत.
अंधारात काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं जातं. फक्त ग्लासवर प्रकाश दिसतो आणि त्यात हळद टाकण्यात येते. याचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहेत.
पाण्यात हळद टाकण्याच्या या ट्रेंडवर एका ज्योतिषांनी गंभीर इशारा दिलाय. यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करतात असा दावा केला आहे.
ज्योतिषी व्यास यांनी म्हटलं की, पाण्यात हळद मिसळणं ही सामान्य प्रक्रिया नाही, तर तांत्रिक क्रिया आहे. चुकूनही असं करू नका.
घरात यामुळे नकारात्मक उर्जा येऊ शकते असा दावा ज्योतिषांनी केलाय. इतकंच नाही तर मानसिक स्थिती बिघडू शकते असंही ज्योतिषांचं म्हणणं आहे.
पाण्यात हळद मिसळण्याच्या ट्रेंडवर इशारा देणारा ज्योतिषांचा हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर युजर्स उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत.
एका युजरनं म्हटलं की, मी तर व्हिडीओ बनवलाय, आता काय करू? तर दुसऱ्या एका युजरने, हे खोटं आहे, हळद पाण्यात टाकून अंघोळ करण्यास सांगितलं जातं असं म्हटलंय.