लग्नसमारंभात ड्रोन उडवण्यासाठी परवानगी आवश्यक आहे का?

अंकिता खाणे (Ankita Khane)

आता बहुतेक लोक लग्न आणि प्री-वेडिंग शूटसाठी ड्रोनद्वारे फोटो आणि व्हिडिओग्राफी करणे पसंत करतात. याशिवाय यूट्यूबवर ब्लॉगिंग करणारे लोकही अनेकदा ड्रोन वापरतात.

पण लग्नात ड्रोन उडवायला परवानगी लागते का, फोटोग्राफरला ड्रोन थेट उडवता येईल का, हा प्रश्न आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील कोणत्याही भागात ड्रोन उडवण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन किंवा पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.

आर्मी कॅन्ट भागात आणि प्रतिबंधित ठिकाणी ड्रोनला बंदी आहे. तेथे ड्रोन उडवताना पकडले गेल्यास दंड आणि तुरुंगवास दोन्ही भोगावे लागू शकते.

सोप्या भाषेत, ड्रोन कुठेही उडवायचे असेल तर स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

स्कायएअर मोबिलिटीचे सीईओ अंकित कुमार म्हणाले की, सरकारने सांगितले की ज्या ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे त्या ड्रोनमध्ये सर्व आकाराच्या ड्रोनचा समावेश आहे.

कोणतेही ड्रोन उडवण्यासाठी अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सरकारी आदेशानुसार, कोणताही छायाचित्रकार आणि ब्लॉगर एरियल फुटेज कॅप्चर करतो, मग त्याने लहान ड्रोन वापरला असेल किंवा मोठा ड्रोन.

त्याला प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसे न केल्यास प्रशासन संबंधित कलमांतर्गत तक्रार दाखल करून कारवाई करू शकते.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea