सकाळ डिजिटल टीम
भटक्या कुत्र्याला हुसकावलं तरी ते जात नाहीत , काठी दाखवल्यावर ते परत आपल्यावरच गुरगुरतात.
जुन्या लोकांनी त्यांच्या अनुभवातून शोधलेला हा एक गावठी उपाय आहे
घराबाहेर आणि दुकानांबाहेर लाल रंगाने भरलेल्या पाण्याच्या बाटल्या लटकवतात.
कुत्र्यांना लाल आणि हिरव्या रंगांचे भेद समजत नाहीत. त्यामुळे ते लाल रंगाच्या वस्तूंपासून दूर राहतात.
या उपायमुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी झाला आहे.
कुत्र्यांना रंग भेदता येत नाहीत, त्यांना लाल आणि हिरवे रंग गडद किंवा राखाडी दिसतात. त्यामुळे त्यांना लाल रंगाची वस्तू दूर दिसते.
कुत्र्यांची दृष्टी ही रंगांधळेपणाच्या समस्येने प्रभावित असते. त्यांना चांगले दिसते परंतु रंगांची ओळख कमी असते, आणि त्यामुळे ते लाल रंगापासून दूर राहतात.
प्राणीशास्त्रज्ञ डॉ. मनीष जैन स्पष्ट करतात की, लाल रंगाच्या बाटल्यांचा कुत्र्यांवर प्रभाव पडण्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.