Anuradha Vipat
डायबिटीस ही सध्या अतिशय मोठी समस्या झाली आहे. आज आम्ही तुम्हाला असे पाच प्रकारचे व्यायाम सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवू शकता.
एरोबिक स्वरूपाचे व्यायाम किंवा कार्डिओ व्यायाम, मधुमेह आणि प्री-डायबेटिसच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
योगासने आणि प्राणायाम रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात
सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराची स्थिती सुधारते. हे तुमच्या स्नायूंसाठी फायदेशीर आहे.
स्ट्रेंथ ट्रेनिंग हा एक प्रकारचा शारीरिक व्यायाम आहे, जो स्नायूंच्या वाढीसाठी, चयापचय सुधारण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो.
सायकलिंग केल्याने तुमच्या शरीरातील रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहते.