Anuradha Vipat
प्रेरणा व्ही अरोरा तिच्या ट्रेलब्लॅझिंग कथाकथनासाठी आणि प्रभावशाली सिनेमॅटिक कामासाठी ओळखली जाते.
आता प्रेरणा तिच्या OTT मध्ये काम करण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे .
तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निधी अग्रवाल प्रेरणाच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याचं कळतंय.
या नव्या प्रोजेक्ट् बद्दल बोलताना प्रेरणा म्हणते "माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मी नेहमीच थिएटर चित्रपट तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अलिकडच्या काळात वेब सिरीज बघून त्यांचं आकर्षक कथाकथन हे मला ओटीटीसाठी काम करण्यासाठी प्रेरणा देत.
पुढे बोलताना प्रेरणा म्हणते, OTT प्लॅटफॉर्म एक्सप्लोर करणे ही माझ्यासाठी एक नवी गोष्ट आहे. OTT प्लॅटफॉर्म हे जगभरातील विविध कथा आणि विषयांचे प्रदर्शन करून विविध प्रकारच्या प्रोजेक्ट ची निर्मिती करत आणि म्हणून मी OTT वर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे
हा चित्रपट प्रेरणा व्ही अरोराच्या SKG एंटरटेनमेंटने UJS स्टुडिओसह निर्मित करण्यात आला असून 24 फेब्रुवारी रोजी त्याचा पहिला लूक प्रदर्शित होणार आहे.