Sunday Fun : रविवारी घरबसल्या करा 'या' ५ रंजक गोष्टी

Saisimran Ghashi

रविवारची सुट्टी म्हणजे थोडा वेळ आपल्यासाठी घालवण्याची आणि आठवड्याच्या कामाच्या गोंधळातून बाहेर पडण्याची संधी.

पण घरी बसून रविवार कसा घालवायचा असा विचार तुम्हाला येत असेल तर चिंता करण्याची गरज नाही.

कारण आज आम्ही तुम्हाला अश्या काही खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या रविवारीचा सुट्टीचा दिवस मजेशीर बनवू शकतात.

व्हर्च्युअल ट्रॅव्हल

तुम्ही व्हर्च्युअल रिअॅलिटीचा वापर करून किंवा ऑनलाइन टूर्सच्या मदतीने जगप्रसिद्ध स्थळांची आणि संग्रहालयांची सफर करू शकता.

घरात स्पा डे

आरामदायक बाथटबमध्ये आराम करा, फेस मास्क लावा आणि तुमचे आवडते पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका. तुमच्या नखांची स्वतःहूनच सुशोभिकरण करा.

नवीन पदार्थ बनवा

एखादी आव्हानात्मक रेसिपी निवडा किंवा तुम्ही ज्या स्वयंपाकशैलीचा पूर्वी प्रयत्न केला नाही असा स्वयंपाक करा.

सिनेमा किंवा मालिका

तुम्हाला बघायची आवड असलेली एखादी मालिका,चित्रपट निवडा आणि बघा.

घरी बनवलेला पॉपकॉर्न, सोफ्यावर बसून हा अनुभव खास बनवा.

नवीन कौशल्य किंवा छंद शिका

नवीन छंद जपण्यासाठी किंवा एखादे नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ द्या. चित्रकला, विणकाम, वाद्य वादन किंवा ऑनलाइन कोर्स करा.

या गोष्टी करून तुम्ही तुमचा Sunday फन डे बनवू शकता.