Saisimran Ghashi
स्टीम फेशियलने स्कीनला खोलवर क्लीन करून नैसर्गिक ग्लो देते.
स्टीम फेशियलने ब्लॅक हेड आणि पिंपल्स कमी होतात.
घरबसल्या तुम्ही या सोप्या पद्धतीने स्टीम फेशियल करू शकता.
फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि दुसरीकडे पाणी गरम करून घ्या.
या गरम पाण्यात गुलाब जल आणि लिंबू पाणी टाका.
या भांड्यातील पाण्याने वाफ घ्या, ही वाफ संपूर्ण चेहऱ्याला मिळाली पाहिजे.
वाफ घेताना डोक्यावर टॉवेल घ्या ज्याने ही वाफ बाहेर जाऊ नये. त्यावेळी डोळे बंद ठेवा.
स्टीम घेऊन झाल्यावर चेहऱ्याला मसाज करा आणि चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
त्यानंतर 20 मिनिटसाठी चेहऱ्यावर बेसन, दही आणि मुलतानी मातीचा लेप लावा, नंतर चेहरा धुवून मॉइसचराईजर लावा.