वाघ बदला घेतो का? माणसाला लक्षात कसं ठेवतो?

संतोष कानडे

वाघ

वाघ हा बुद्धिमान वन्यप्राणी असून त्याच्यात परिसर आणि अनुभव लक्षात ठेवण्याची क्षमता असते.

शिकार

वाघ आपल्या अधिवासातील वाटा, पाणवठे, शिकारीची ठिकाणे आणि इतर वाघांची उपस्थिती लक्षात ठेवू शकतो.

वैज्ञानिक पुरावे

वाघ माणसाला चेहऱ्यावरूनच ओळखून ठेवतो, असे ठामपणे सांगण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

संभाव्य धोका

मात्र, वास, आवाज आणि हालचाली यांसारख्या संकेतांच्या आधारे तो परिचित परिस्थिती आणि संभाव्य धोका ओळखू शकतो.

पूर्वीचा अनुभव

एखाद्या माणसाशी आलेला पूर्वीचा अनुभव वाघाच्या पुढील वर्तनावर परिणाम करू शकतो.

संरक्षण

पिल्लांना धोका जाणवल्यास वाघीण त्यांचे संरक्षण करण्यासाठी आक्रमक होऊ शकते.

जखमी

जखमी झालेला किंवा घाबरलेला वाघही स्वतःच्या बचावासाठी हल्ला करू शकतो.

सूड

काही वेळा वाघ माणसाचा पाठलाग करतो किंवा पुन्हा त्याच परिसरात दिसतो; पण याचा अर्थ तो सूड घेत आहे, असा होत नाही.

बदला

वाघ माणसांप्रमाणे मुद्दाम बदला घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा शोध घेतो, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.

स्मरणशक्ती

त्यामुळे वाघाची स्मरणशक्ती आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता महत्त्वाची असली, तरी त्याला सूडबुद्धीचा प्राणी म्हणता येत नाही.

क्षमता

वाघाची स्मरणशक्ती आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता मात्र खरंच वाखाणण्याजोगी असते.

लोणावळ्याच्या 'त्या' भयंकर बंगल्याचं खरं रहस्य काय?

lonavala

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>