दूध आणि अंडी एकत्र खाता? मग हे नक्की वाचा!

Aarti Badade

दूध-अंडी एकत्र खाणं

दररोज नाश्त्यात दूध आणि अंडी एकत्र घेत असाल, तर ही माहिती नक्की जाणून घ्या. विशेषतः कच्ची अंडी दुधात मिसळून पिण्याबाबत तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

Egg milk 

|

Sakal

दूध आणि अंडी दोन्ही पौष्टिक

दूध आणि अंडी हे प्रथिने, अमिनो ॲसिड्स, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांचे स्रोत आहेत. त्यामुळे शरीराची ताकद आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी अनेकजण त्यांचा आहारात समावेश करतात.

Egg milk 

|

Sakal

मात्र कच्ची अंडी दुधात मिसळू नका!

कच्ची अंडी दुधात मिसळून घेण्याची सवय टाळणे योग्य ठरू शकते. अशा प्रकारे सेवन केल्यास पचनाशी संबंधित त्रास आणि अन्नातून विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो, असा या लेखात उल्लेख आहे.

Egg milk 

|

Sakal

साल्मोनेलाचा धोका

कच्च्या अंड्यांमुळे साल्मोनेलासारख्या संसर्गाचा धोका असू शकतो. त्यामुळे अंडी चांगली शिजवून खाणे अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो.

Egg milk 

|

Sakal

पचनाचा त्रास होऊ शकतो?

काही लोकांना दूध आणि अंडी एकत्र घेतल्यानंतर पोट फुगणे, अस्वस्थता, पोटदुखी किंवा जुलाबासारखे त्रास जाणवू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची पचनक्षमता वेगळी असते.

Egg milk 

|

sakal

अंड्याचे फायदेही अनेक!

अंड्यातील व्हिटॅमिन D, B12, कोलीन, फोलेट आणि ओमेगा-3 फॅट्स शरीरासाठी महत्त्वाचे आहेत. हे पोषक घटक स्नायूंचे कार्य, ताकद आणि एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

Egg milk 

|

Sakal

मग काय करावे?

कच्ची अंडी दुधात मिसळून घेण्याऐवजी शिजवलेली अंडी आणि दूध आहारात घ्या. दोन्ही पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास जाणवत असेल, तर आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Egg milk 

|

Sakal

रात्री लवंग का खावी? शरीरात काय बदल होतात?

Eat Cloves at Night

|

Sakal

येथे क्लिक करा