Anushka Tapshalkar
जगाच्या पाठीवर कुठेही जा, अभ्यास करताना झोप येत नाही असं म्हणणारी फारच कमी माणसं तुम्हाला भेटतील. पण यामुळे अभ्यास करण्यात अडथळा येतो. हे टाळण्यासाठी काही उपाय प्रभावशाली ठरतात. ते पाहूया.
रोज पुरेशी झोप घ्या. झोप पूर्ण झाली तर अभ्यास करताना डोळे मिटणार नाहीत.
मोठ्याने वाचा, समोरच्याला समजावून सांगा. असे केल्याने विषय लक्षात राहतो आणि झोप येत नाही.
अभ्यासासाठी प्रसन्न, शांत आणि चांगल्या प्रकाशाची जागा निवडा, जी लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. अंधुक प्रकाश व खूप आरामदायक वातावरण झोप आणू शकते.
दर अर्ध्या तासाने ५ मिनिटांचा ब्रेक घ्या. चालायला जा, हाता-पायाची हालचाल करा. त्यामुळे मन ताजं राहील.
अभ्यास करताना नियमितपणे पाणी प्या. त्यामुळे झोप येत नाही आणि मेंदू अॅक्टिव्ह राहतो.
दररोज थोडा व्यायाम करा. यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहतं आणि अभ्यास करताना झोप येत नाही.
मित्रांसोबत अभ्यास केल्याने विषयात रस निर्माण होतो आणि झोप येत नाही.
चहा-कॉफीऐवजी प्रोटीन आणि फायबरयुक्त हलके, पौष्टिक पदार्थ खा. हे तुम्हाला जास्त एनर्जी देतील.