तुम्हाला कठीण प्रसंगी राग अनावर होतो? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Anushka Tapshalkar

राग- एक भावना

राग की एक प्रकर्षाने व्यक्त केली जाणारी भावना आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ही भावना व्यक्त करतात. काहीजण शांतपणे तर काहीजण आक्रोशाने.पण बऱ्याच जणांना राग नियंत्रित करणे अवघड जाते.

Anger an emotion | sakal

नियंत्रण

वेळीच रागावर नियंत्रण नाही केले तर त्याचे आपल्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी आपले ट्रिगर पॉईंट्स ओळखणे गरजेचे असते. त्यासाठी पुढील टिप्स फॉलो करा.

Anger management | sakal

बोलण्या आधी विचार करा

आपण सहसा रागारागात काय बोलतो याचे आपल्याला भान नसते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावू शकते. म्हणून बोलण्याआधी विचार करून बोला.

Think before you speak | sakal

विश्रांती घ्या

विश्रांती ही फक्त लहानांसाठी, वृद्धांसाठी किंवा कॉलेजला जाणाऱ्या व्यक्तींसाठी नसते. वेळोवेळी आपणही स्वतःला विश्रांती देऊन आपल्याला काय त्रास होत आहे हे समजून घ्यावे आणि मगच आपल्या भावना व्यक्त कराव्यात.Solution

Relax | sakal

प्रभावी उपाय निवडा

आपले ट्रिगर पॉईंट्स आणि राग येण्यामागची कारणे शोधल्यानंतर त्यावर प्रभावी उपाय शोधा. त्यासाठी एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत तुम्ही संवाद साधू शकता.

Solution | sakal

कोणाच्याही विरोधात राग धरू नका

कोणावरही जास्त काळ रागावून राहू नका. राग येणे स्वाभाविक आहे पण तो जास्त काळ राखून ठेवणे योग्य नाही. एखादी गोष्ट तिथेच विसरून त्यातून नवीन शिकवण घ्या.

Don't Hold Grudges | sakal

ध्यान व चिंतन करा

रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. ध्यान आणि दीर्घ श्वसनाने तुमचे शरीर आणि मन शांत राहते. यासोबतच तुम्ही योगा देखील करू शकता.

Meditate | sakal

मनमोकळे बोला

एकदा मन शांत झाले की तुमचे विचार स्पष्ट होतात आणि त्यामुळे तुम्ही ते अजून चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकता.

Express Thoughts | sakal

लहान मुलांमधील वाढता ताण कमी करण्यासाठी पालकांनी फॉलो करा 'या' टिप्स

Stressed Kid | sakal
आणखी वाचा