Anushka Tapshalkar
आजच्या घाई-गडबडीच्या आणि शर्यतीच्या जीवनात लहान मुलांचा मानसिक ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांच्यात चिडचिड, मूड स्विन्ग्स , हट्टीपणा जास्त प्रमाणात जाणवतो.
पालकांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मुलांचा ताण कमी होण्यास मदत होईल व त्यांची अभ्यासात आणि इतरत्र प्रगती होईल. त्यासाठी पालकांनी पुढील काही टिप्स फॉलो करा.
मुलांशी मोकळेपणाने बोला. ते तुमच्याशी काहीही शेअर करू शकतात याची जाणीव करून द्या. त्यांचे ऐकून घेतल्यावर लगेच निर्णय जाहीर करू नका. एक जजमेंट-फ्री स्पेस तयार करा.
घरात एक समजूतदार आणि सकारात्मक वातावरण तयार करा, जिथे तुमच्या मुलाला भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल. तसेच टीका करणे टाळा व त्यांच्या छोट्या कामगिरीवरही प्रोत्साहित करा जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
आजकाल मुले अभ्यास, अवांतर उपक्रम यात व्यस्त असतात. हा दबाव कमी करण्यास मदत करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे अभ्यास व खेळ यांचा समतोल साधण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा, जेणेकरून त्यांना मित्र आणि मनोरंजनासाठीही वेळ मिळेल.
सध्या सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे सुद्धा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम मर्यादित करा. तसेच त्यांना प्रत्यक्षात जास्तीत जास्त लोंकाना भेटण्यासाठी प्रोत्साहित करा.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मूल मानसिक समस्यांना सामोरे जात आहे, तर लगेच तज्ज्ञांशी किंवा मानसशास्त्रज्ञांशी संपर्क साधा. योग्य वेळी मिळालेली मदत मुलाचे मानसिक आरोग्य सुधारू शकते आणि त्यांच्या भविष्यासाठी मजबूत पाया तयार करू शकते.