Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील त्यांचे थोरले बंधु, संभाजी शहाजी भोसले हे एक महत्वाचा व्यक्तिमत्व होते.
संभाजी शहाजी भोसले यांचा जन्म १६२३ मध्ये झाला. ते शहाजी राजे आणि जिजाबाई यांचे थोरले पुत्र होते.
शिवाजी महाराजांचा जन्म किल्ले शिवनेरी येथे झाला असताना संभाजी शहाजी भोसले विजापूरच्या निजामशाहीत होते.
शिवाजी महाराजांचे थोरले बंधू असलेल्या संभाजी यांचे इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांचा राज्यप्रशासनात आणि युद्धातील अनुभव खूप महत्त्वाचा होता.
कर्नाटकातील कनकगिरी येथील लढाईत संभाजी शहाजी भोसले यांचा मृत्यू झाला. या लढाईत त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
अफजल खानाने संभाजी शहाजी भोसले यांना दगाफटका केल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी मान्यता आहे.
'राजा शिवछत्रपती' मालिका आणि 'शेर शिवराज' चित्रपटांमध्ये संभाजी शहाजी भोसले यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
छत्रपती शिवरायांबरोबरच आपण त्यांच्या थोरल्या भावाचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.