Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
ती 'होणार सून मी या घरची', 'अग्गबाई सासूबाई' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
सध्या तिच्या मुलाखती सोशल मीडियावर प्रचंड गाजतायत.
या मुलाखतींमध्ये तिने तिचा लग्नसंस्थेवर अजूनही विश्वास असल्याचं सांगितलं.
त्यामुळे ती दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्यास तयार आहे. तिने तिला कसा नवरा हवा हेदेखील सांगितलं.
मात्र तेजश्रीचं वय किती आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?
तेजश्रीचा जन्म २ जून १९८८ साली झाला. ती मूळची डोंबिवलीची आहे.
तेजश्री सध्या ३६ वर्षांची आहे.
तिने २०१४ साली शशांक केतकर याच्याशी लग्नगाठ बांधली होती.
मात्र वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला.