Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
ती 'होणार सून मी या घरची' मधून घराघरात पोहोचली.
तिने 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतूनही प्रचंड लोकप्रियता मिळाली.
घटस्फोटानंतरची ती तिची पहिली मालिका होती.
त्यानंतर ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसली.
या मालिकेत ती मुख्य भूमिकेत म्हणजेच मुक्ताच्या भूमिकेत होती.
मात्र तिने या मालिकेला रामराम ठोकला.
या मालिकेसाठी तिला किती मानधन मिळत होतं तुम्हाला ठाऊक आहे का?
सूत्रांच्या माहितीनुसार, या मालिकेसाठी तेजश्रीला एका भागासाठी ४० ते ४५ हजार रुपये मिळत होते.
तर एका प्रोडक्टच्या ब्रँड एम्बॅसिडर पदासाठी ती वर्षाचे पाच लाख रुपये घेते.