Payal Naik
लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खान हिने बॉलिवूडला उत्तम चित्रपट दिले. तिने २०२४ मध्ये तिचं युट्यूब चॅनेल सुरू केलं.
या युट्युब चॅनेलवर फराहा खान अनेक कलाकारांसोबतचे कुकिंग व्हिडिओ शेअर करत असते. त्यात सगळ्यात जास्त चर्चा होते ती तिच्या कुकची.
फराह खानचा कुक दिलीप मुखिया तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो. सर्व कलाकार त्याच्याबरोबर मज्जा-मस्ती करताना दिसतात.
त्याच्या विनोदी स्वभावामुळे आता दिलीपचा स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण झालाय.
दिलीप हा शाहरुख खानबरोबर झळकला आहे. दिलीपनं शाहरुख खानबरोबर Myntraसाठी एक जाहिरात शूट केली होती.
तो रोजगाराच्या शोधात मुंबईत आला होता. घरगुती स्वयंपाकी म्हणून अनेक ठिकाणी काम केलं. गेली १० वर्ष तो फराहकडे कूक म्हणून कामाला आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, दिलीपला सध्या दर महिन्याला १ लाख रुपयांपेक्षा अधिक पगार आहे.
फराहने आपल्या व्लॉगमध्ये मजेत सांगितलं की, "दिलीपने १ लाख रुपयांची अभिनयाची ऑफर नाकारली, कारण आता त्याच्यासाठी १ लाख ही रक्कम कमी वाटते".
आज दिलीपकडे BMW कार आहे. तो म्हणतो, "आता मला त्यापेक्षाही महागडी कार खरेदी करावी लागेल". त्याने गावाला तीन मजली बंगला बांधला आहे. ज्यात स्विमिंग पूल देखील आहे.
मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर पण प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं भाडं किती?