Monika Shinde
ATM म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन एक अशी यंत्रणा जी ग्राहकांना बँकिंग व्यवहार स्वतंत्रपणे करण्याची सुविधा देते
जसे की पैसे काढणे, पैसे जमा करणे, मिनी स्टेटमेंट मिळवणे, फंड ट्रान्सफर्स आणि इतर बँकिंग सेवा देण्यात येते. ज्यामुळे वेळ आणि मेहनत वाचते.
ATM 24/7 उपलब्ध असतात, त्यामुळे कोणत्याही वेळेस आपत्कालीन किंवा दैनंदिन गरजांसाठी बँकिंग व्यवहार करता येतात. त्यामुळे ते सर्वांसाठी सोयीचे असतात.
एटीएम हे दोन प्रकारचे असतात.
ऑन-साइट म्हणजे बँकेच्या परिसरात असलेला एटीएम होय
सार्वजनिक ठिकाणी असतो. दोन्ही प्रकाराचे एटीएम ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करतात आणि सुविधा वाढवतात.
ATM मध्ये पिन ची आवश्यकता असते, जे खाते प्रवेश सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. यामुळे अनधिकृत व्यवहार रोखले जातात आणि वापरकर्त्यांची सुरक्षा सुनिश्चित होते.
ATM ने दूरदराज भागांमध्ये बँकिंग सेवा सहज उपलब्ध केली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सुविधा मिळतात आणि शहरी-ग्रामीण अंतर कमी होते.