सलमान-शाहरुखच्या घराजवळ वसलंय मिनी गोवा, भन्नाट लोकेशन!

Mansi Khambe

गोवा

गोवा म्हटलं की, निळाशार समुद्रकिनारे, मऊ रेती, नारळाची झाडं आणि शांत वातावरण डोळ्यासमोर येतात. मात्र गोव्याला जाणं प्रत्येक वेळी शक्यच होईल असं नाही.

Mumbai Mini Goa

|

ESakal

मिनी गोवा

पण मुंबईतच असे एक ठिकाणं आहे जे सौंदर्य, समुद्रकिनारे आणि शांत वातावरणामुळे ‘मिनी गोवा’ म्हणून ओळखले जाते. जे शहरापासून दूर नाही तर, सलमान-शाहरुखच्या घराजवळचं वसलं आहे.

Mumbai Mini Goa

|

ESakal

रनवार गाव

वांद्रे पश्चिम येथील रनवार गाव मुंबईतील सर्वांत जुन्या शहरी गावांपैकी एक आहे. हे पोर्तुगीज व वसाहतकालीन खुणांमुळे अनेकदा याचा उल्लेख ‘मिनी गोवा’ असा केला जातो.

Mumbai Mini Goa

|

ESakal

गोव्यातील छोटं गाव

या गावातली जुनी घरं, छोटे रस्ते, गल्ल्या तसेच काही स्त्री-पुरुषांचे कपडे आणि त्यांची खाद्यसंस्कृती पाहून खरोखरच आपण गोव्यातल्या एखाद्या छोट्या गावामध्ये आल्यासारखं वाटतं.

Mumbai Mini Goa

|

ESakal

२४ गावांपैकी एक

पाली व्हिलेज येथील वरोडा रोड आणि चॅपेल रोडच्या दरम्यान वसलेले 'रनवार गाव' वांद्रे येथील मूळ २४ गावांपैकी एक आहे.

Mumbai Mini Goa

|

ESakal

इतिहास

१७ व्या शतकापर्यंत मागे जाणारा इतिहास असलेले हे गाव, मुंबईतील सर्वात जुन्या 'ईस्ट इंडियन' समुदायांपैकी एक आहे.

Mumbai Mini Goa

|

ESakal

विस्तार

शहराचा विस्तार होत असतानाही या गावात 'व्हेरोनिका स्ट्रीट'वर अनेक घरे आजही मूळ स्वरूपात टिकून आहेत. जसे की कमानीदार प्रवेशद्वारे, शटर असलेल्या खिडक्या आणि कौलारू छपरे.

Mumbai Mini Goa

|

ESakal

मुंबईच्या कथा

पाली व्हिलेजच्या या गल्ल्यांमध्ये प्रवेश करताच 'ईस्ट इंडियन' संस्कृती, जुन्या काळातील वास्तुकला आणि वसाहतकालीन मुंबईच्या कथा दिसून येतात.

Mumbai Mini Goa

|

ESakal

तुम्ही पण सकाळी उठताच मोबाईल पाहता का? हे फक्त व्यसन नाही तर...

People check phone after waking up

|

ESakal

येथे क्लिक करा