Mansi Khambe
सकाळी अलार्म वाजल्यानंतर जाग येताच अलार्म बंद करण्यासाठी फोन हातात घेतात. मात्र तो बंद केल्यानंतर बऱ्याच लोकांना फोन चालवण्याची सवय असते.
People check phone after waking up
ESakal
अंथरुणातून नीट उठलेलेही नसतानाही, अनेकजण व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामवर, हवामानाचा अंदाज, ईमेल किंवा इतर गोष्टी पाहण्यासाठी फोन उघडतात. अनेकदा याला 'स्मार्टफोनचे व्यसन' म्हटले जाते.
People check phone after waking up
ESakal
मानसशास्त्राच्या दृष्टीने, ही गोष्ट अधिक गुंतागुंतीची आहे. सकाळी उठल्याबरोबर फोन हातात घेणे हे सामान्य नसून, त्यामागे सवय लागण किंवा विशिष्ट गोष्टींकडे लक्ष वेधले जाणे अशी अनेक कारणे असू शकतात.
People check phone after waking up
ESakal
मानसशास्त्रानुसार, तुमच्या मेंदूला जाणून घ्यायचे असते की रात्रीच्या काळात काय बदलले आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेच फोन तपासल्यामुळे तुमच्या मेंदूला ही अनिश्चितता कमी करण्यास मदत होते.
People check phone after waking up
ESakal
म्हणजेच, तुम्ही झोपलेले असताना बाहेरचे जग सुरूच असते. त्यामुळे दिवस सुरू करण्यापूर्वी तुमच्या मेंदूला हे जाणून घ्यायचे असते की काही महत्त्वाचे बदल झाले आहेत का.
People check phone after waking up
ESakal
मानसशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा माणसाला अनिश्चितता जाणवते, तेव्हा तो स्वाभाविकपणे माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो. स्मार्टफोनच्या माध्यमातून ही माहिती त्वरित उपलब्ध होते.
People check phone after waking up
ESakal
याचे दुसरे स्पष्टीकरण habit loop. म्हणजेच जेव्हा एखादी कृती एकाच परिस्थितीत वारंवार केली जाते आणि ती आपोआप घडू लागते, तेव्हा तिचे रूपांतर सवयीत होते.
People check phone after waking up
ESakal
सकाळची वेळ ही अशा सवयींसाठी सर्वात प्रभावी असते. तुम्ही उठता, अलार्म बंद करता आणि फोन तुमच्या हातात येतो. कालांतराने, ही संपूर्ण प्रक्रिया सहज होते, वर्तणूक संशोधक याला ' cue-routine-reward म्हणतात.
People check phone after waking up
ESakal
Mineral water & Packaged water
ESakal