Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. चाहते कायमच तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
तुम्हाला प्राजक्ता माळीचं गाव ठाऊक आहे का?
प्राजक्ता नुकतीच तिच्या गावी पोहोचलीये. तिने तिथले काही खास फोटो शेअर केलेत.
सोबतच या कावड यात्रेमागची गोष्टही सांगितलीये.
प्राजक्ताचं गाव आहे पंढरपूरमधील भाळवणी.
भाळवणी गावातून मनाची कावड शिंगणापूरला जाते. या कावड यात्रेसाठी दरवर्षी प्राजक्ता आवर्जून हजेरी लावते.
यावर्षीही ती तिथे गेलीये. भाळवणी हे प्राजक्ताचं आजोळ आहे.
प्राजक्ता शेवटची 'बूम चीक चीक बूम' या चित्रपटात दिसली होती.
रणबीरच्या 'रामायण' मध्ये कैकयीच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री; घटस्फोटित खेळाडूशी केलंय लग्न