Anushka Tapshalkar
मूग डाळ प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि कार्बोहायड्रेट्स यांचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे भिजवलेले मूग नाश्त्याचा उत्तम पर्याय असून हे सहज पचत असल्यामुळे शरीरासाठी पोषणदृष्ट्या परिपूर्ण मानले जाते.
सकाळी मूग खाल्ल्याने चांगल्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स मिळतात, जे दिवसभरासाठी ऊर्जा पुरवतात.
मूग कमी कॅलरीयुक्त असून पचनास हलकी असते, त्यामुळे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.
भिजवलेले मूग फायबरने समृद्ध असल्यामुळे पचनसंस्था मजबूत करते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्तता देते.
यामध्ये जीवनसत्त्व E आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.
मूग डाळीत अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करतात.
भिजवलेल्या मूगमध्ये भरपूर प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन C असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.
मूगमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयासाठी फायदेशीर असून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
मूगमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.