Anushka Tapshalkar
तुम्ही जर पुरेसा आहार घेत नसाल तर त्याचे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात, जे लगेच जाणवत नाहीत. जर तुम्ही पुरेसा आहार घेत नसाल तर तुमच्या शरीराने दिलेली ही ८ लक्षणे दुर्लक्षित करू नका.
पूर्ण झोप होऊनही तुम्हाला सतत थकवा किंवा अनुत्साही वाटते कारण शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. याचा परिणाम तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर आणि एकंदरीत आयुष्याच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. त्यामुळे पुरेसा आहार महत्त्वाचा आहे.
तुम्हाला एका ठिकाणी लक्ष केंद्रित करायला किंवा चित्त एकाग्र करायला अडचण येते. हे तुमच्या शरीराला पुरेसं ग्लुकोज मिळत नसल्याचे दर्शवते.
जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर ते कमी आहारामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे लक्षण दर्शवते.
आहारात पोषणतत्त्वांची कमतरता असेल तर रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होते, ज्यामुळे चिडचिडेपणा आणि मूड स्विंग्स होऊ शकतात.
अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि प्रोटीनचा अभाव असलेल्या आहारामुळे केस गळणे किंवा केस विरळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
पुरेसा आहार न घेतल्याने शरीराला पुरेश्या कॅलरीज मिळत नाहीत. यामुळे शरीर स्नायू आणि चरबी कमी करू लागते, परिणामी वजन आपोआप कमी होते.
अपुऱ्या आहारामुळे मेटाबोलिझम मंदावते, ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण होते आणि थंडी वाजण्याचे प्रमाण वाढते.
कमी आहार घेतल्याने पचन प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे गॅस, ब्लोटिंग अशा समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. तसेच नियमित मलप्रवृत्ती होऊ शकत नाही.