सकाळ डिजिटल टीम
देशात जामा मशीद नावाची एकच मशीद नाही, तर ती अनेक ठिकाणी आहे.
मशीद आणि जामा मशीद यात खूप फरक आहे. तो आपण समजून घेऊ..
मशीद ही 'अल्लाह'च्या उपासनेचे ठिकाण आहे. इस्लाम धर्मावर विश्वास ठेवणारे लोक येथे जमतात.
ही मशीद इस्लामिक संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र देखील आहे. मुस्लिम येथे दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्यासाठी येतात.
तुम्ही दिल्लीच्या जामा मशिदीबद्दल ऐकलं असेलच, ती एकमेव अशी मशिदी नाही तर इतर अनेक मशिदींनाही हा दर्जा आहे.
प्रत्येक रस्त्यावर एक मशीद आढळते, जिथे पाच वेळा नमाज अदा केली जाते. परंतु, जामा मशीद अशी आहे, जिथे शुक्रवारीच नमाज सामूहिकपणे अदा केली जाते.
प्रत्येक शहरात एक मोठी मशीद असते, ज्याला जामा मशीद म्हणतात. दर शुक्रवारी मोठ्या संख्येने मुस्लिम तेथे नमाज अदा करण्यासाठी जमता
जामा मशिदीचा एक अर्थ असा आहे, की शहरातील सर्वात मोठी मशीद किंवा सर्वात जुन्या मशिदीला हा दर्जा दिला जातो.
जागेच्या बाबतीत जामा मशीद इतर सामान्य मशिदींपेक्षा खूप मोठी आहे. दिल्ली व्यतिरिक्त, संभल आणि आग्राची जामा मशीद देखील प्रसिद्ध आहे.