सकाळ डिजिटल टीम
Vasota Fort History : औरंगजेबने महाराष्ट्र काबीज करण्याच्या उद्देशाने अनेक गड-किल्ल्यांवर आक्रमण केले.
मात्र, एक असा किल्ला आहे जिथं पर्यंत औरंगजेब कधीच पोहचू शकला नव्हता. हा म्हणजे, साताऱ्यातील वासोटा किल्ला.
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला 'वासोटा किल्ला' नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतो.
हा असा एक गुप्त किल्ला आहे, जिथं फितुर तसेच शत्रुंना ठेवलं जायचं आणि याच किल्ल्यावरुन त्यांना कडेलोट केलं जायचं, असे इतिहासात यासंदर्भात दाखले सापडतात.
परंतु, हा गुप्त किल्ला औरंगजेबला कधीच सापडला नव्हता.
सातारा शहराच्या पश्चिमेस 40 ते 42 किमी अंतरावर जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील एका डोंगरावर वासोटा किल्ला आहे.
गिरीदुर्गा बरोबरच वनदुर्गसुद्धा आहे म्हणून याला ‘मिश्रदुर्ग’ असं म्हटलं जातं.
वासोटा किल्ला हा वनदुर्ग प्रकारात मोडतो. शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने हा किल्ला बांधल्याची इतिहासात नोंद सापडते.
हा किल्ला घनदाट जंगलात दडलेला आहे. या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी नदीतून प्रवास करावा लागतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असल्याचे दाखले मिळतात.
बामणोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर तलाव बोटीने पार करावा लागतो.