रोज 'या' बँकांमध्ये जाता, पण फुलफॉर्म काय माहित आहे का?

Anushka Tapshalkar

प्रायव्हेट सेक्टर बँक

भारतातील बँकिंग क्षेत्रात अनेक प्रायव्हेट सेक्टर बँका कार्यरत आहेत ज्या केवळ आर्थिक व्यवहारच नाही तर देशाच्या विकासातही मोठा वाटा उचलतात.

नावाचे फुलफॉर्म

या बँकांची नावं आपल्याला रोज दिसतात आणि वापरातही येतात, पण त्यांच्या नावामागचा पूर्ण फुलफॉर्म आणि इतिहास अनेकांना माहित नसतो.

खाजगी बँका

ICICI, HDFC, Axis आणि Karnataka Bank यांसारख्या बँकांची सुरुवात, नावामागचा अर्थ आणि त्यांचा प्रवास समजून घेणे रंजक आहे.

ICICI बँक

ICICI (Industrial Credit and Investment Corporation of India) ची स्थापना 1955 मध्ये झाली. औद्योगिक प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी विकास वित्त संस्था होती. 1990 च्या दशकात ती व्यावसायिक बँकेत रूपांतरित झाली. आज भारतातील प्रमुख प्रायव्हेट बँकांपैकी एक आहे.

HDFC बँक

HDFC बँक 1994 मध्ये स्थापन झाली. तिची मूळ संस्था HDFC (1977) ही गृहनिर्माण वित्त पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करणारी होती. लिबरलायझेशननंतर सुरू झालेल्या या बँकेचा फुलफॉर्म Housing Development Finance Corporation Bank असा आहे.

Axis Bank (पूर्वी UTI Bank)

1993 मध्ये UTI Bank म्हणून सुरुवात झाली. त्याचा फुलपफॉर्म Unit Trust of India Bank असून 2007 मध्ये तिचे नाव बदलून Axis Bank ठेवण्यात आले.

KBL बँक

1924 मध्ये मंगळूर येथे स्थापन झालेली ही भारतातील जुन्या प्रायव्हेट बँकांपैकी एक आहे, जी आजही स्वतंत्र ओळख टिकवून आहे. याचा फुलफॉर्म Karnataka Bank Limited असा आहे.

या योजनेत फक्त 300 रुपयांची गुंतवणूक बनवेल तुमच्यासाठी 15 लाखांचा फंड!

Only ₹300 Investment Can Turn Into ₹15 Lakh Fund – Is This Real or Hidden Secret?

|

eSakal

आणखी वाचा