स्त्रियांमध्ये आढळणारे 5 प्रमुख पोटाच्या चरबीचे प्रकार

Anushka Tapshalkar

पोटाची चरबी

पोटाची चरबी साठू शकते, जसे की ताण-तणाव, हार्मोनल असंतुलन, पचन समस्या इत्यादी.

Belly Fat | sakal

ताण-तणावामुळे

सततच्या ताण-तणावामुळे शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. ताणामुळे गोड आणि स्निग्ध पदार्थ खावेसे वाटत, ज्यामुळे पोटाभोवती गोलसर आणि कठीण प्रकारची चरबी साठते.

Stressed Belly Fat | sakal

PCOSमुळे

PCOS असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिन पातळी जास्त असते, ज्यामुळे ओटी पोटाभोवती जाडसर चरबी साठते आणि ब्लोएटिंग झाल्यासारखे वाटते. हार्मोनल असमतोलामुळे ही चरबी कमी करणे कठीण होते.

PCOS Belly Fat | sakal

थायरॉईडमुळे

थायरॉईड हार्मोनच्या कमतरतेमुळे मेटाबोलिझम मंदावते आणि ओटी पोटाभोवती चरबी तयार होते आणि त्वचा कोरडी व फुगलेली वाटू शकते. यात विशेषतः आहारात काही बदल नसले तरी वजन वाढू शकते.

Thyroid Belly Fat | sakal

मेनोपॉजमुळे

मेनोपॉज दरम्यान इस्ट्रोजन पातळी कमी होऊन इन्सुलिन पातळी वाढते. यामुळे पोट आणि ओटी पोटाभोवती मऊ आणि ढिल्ली चरबी साठते. ४०-४५ वर्षांवरील महिलांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे.

Menopause Belly Fat | sakal

ब्लोटिंगमुळे

पोटातील ऍसिडची आणि डायजेस्टिव्ह एंझाईम्सच्या कमतरतेमुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे पोट फुगलेले वाटते. तसेच दिवसातून वेळोवेळी पोटाचा आकारही बदलतो. बऱ्याचदा गॅस आणि अपचनाच्या तक्रारी जाणवतात.

Bloated Belly Fat | sakal

अल्कोहोलमुळे

अतिरिक्त अल्कोहोलच्या सेवनामुळे शरीराची शुद्धीकरण प्रक्रिया विस्खलित होते. परिणामी पोटाभोवती अधिक चरबी साठते. याचबरोबर संपूर्ण शरीरावरही चरबी वाढू शकते.

Alcohol Belly Fat | sakal

वजन कमी करायचंय? मग 'हे' पदार्थ आजच खायला सुरुवात करा!

Balanced Diet | sakal
आणखी वाचा