Anuradha Vipat
प्रसिद्ध कलाकार, तबला वादक, संगीतकार, अभिनेते झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन हे अमेरिकेत वास्तव्य करत होते.
त्यांच्या निधनामुळे भारतीय आणि जागतिक संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
झाकीर हुसैन यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात भारतीय शास्त्रीय संगीतापासूनच केली होती.
वॉशिंग्टन येथील विद्यापीठात त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट ही पदवीही घेतली.
व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसैन हे पहिले संगीतकार ठरले होते
झाकीर हुसैन यांनी १२ व्या वर्षी वडिलांसह तबला वादन केलं तेव्हा त्यांना ५ रुपये मानधन मिळालं होतं