Payal Naik
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
ती प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. तिच्या असण्याने मालिकेचा टीआरपी हा मोठा उच्चांक गाठतो.
आता तेजश्री तिच्या नव्या मालिकेमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. ती नुकतीच 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
तिच्या चाहत्यांनी ही मालिकादेखील डोक्यावर घेतली आहे. तेजश्रीबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात.
तेजश्रीचा जन्म डोंबिवलीचा आहे. ती तिथेच लहानाची मोठी झाली.
मात्र आता तेजश्री कुठे राहते हे तुम्हाला ठाऊक आहे का?
तेजश्रीने लहानपणी ठरवलेल्या ठिकाणीच स्वतःचं नवीन घर घेतलंय.
तेजश्रीने गोरेगाव येथे घर घेतलं आहे. तिने लहानपणी गोरेगाव येथे घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
हे स्वप्न तिने पूर्ण केलं.
अपघातानंतरही रंजना माझ्याशी अशोक मामांबद्दल बोलायची