Payal Naik
मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर प्रेक्षकांची आवडती आहे.
तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या ती अनेक चित्रपटात काम करताना दिसतेय.
नुकताच सईने तिचा ३९ वा वाढदिवस साजरा केला.
यासाठी ती एका खास ठिकाणी पोहोचली होती. तिने त्या ठिकाणचे काही फोटोही शेअर केलेत.
सई तिच्या वाढदिवसानिमित्त एका धबधब्यावर गेली होती. येथे ती तिच्या मित्रांसोबत गेली होती.
तिथले काही फोटोही तिने शेअर केलेत. हे ठिकाण कुठे आहे हे मात्र तिने सांगितलं नाही.
मात्र नेटकऱ्यांनी कमेंट करत या ठिकाणाचं नाव सांगितलंय.
हे ठिकाण भंडारधरा येथील वसुंधरा धबधबा आहे. हे ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यात आहे.
सई नुकतीच 'गुलकंद' या चित्रपटात दिसली होती. तर ती हास्यजत्रेमध्ये देखील परीक्षकाच्या भूमिकेत दिसतेय.
प्रार्थना बेहेरेप्रमाणे 'या' मराठी अभिनेत्रीलाही नकोयत मुलं; कारण...