सकाळ डिजिटल टीम
थोरले बाजीराव, नानासाहेब आणि माधवराव पेशवे यांचे पंढरपूरशी खूप जवळचे नाते होते. त्यांनी अनेकदा येथे मुक्काम केला.
बाजीराव दुसरे २७० दिवस पंढरपूरमध्ये होते!
सन १८०९ मध्ये आषाढ शुद्ध दशमीला, बाजीराव दुसऱ्याने माऊलींसोबत वाखरी ते पंढरपूर पायी वारी केली. पायी वारी करणारे ते पहिले पेशवे होते.
या वारीसाठी बाजीरावासोबत ढमढेरे, आवटी, विंचूरकर, पुरंदरे, बापू गोखले, त्रिंबकजी डेंगळे आणि शेलूकर हे सरदार होते.
बाजीरावाने पंढरपूरमध्येच अनेक राजकीय निर्णय घेतले. राजकारणाचे अनेक डावपेच इथेच शिजत असत.
पंढरपूरमध्ये घेतलेल्या काही राजकीय भूमिका पुढे जाऊन इतिहास ठरल्या.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने, इथे राजकीय आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळत असे. बाजीरावासाठी हे ठिकाण प्रेरणास्थान होते.
पेशव्यांच्या काळात पंढरपूर हे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठिकाण होते.