हिवाळ्यात Diabetesची घ्या 'अशी' काळजी; वापरा डॉक्टरांनी दिलेल्या सिंपल टिप्स

Anushka Tapshalkar

हिवाळा आणि डायबिटीज

हिवाळ्यात शरीराची हालचाल कमी होते, कार्बोहायड्रेटयुक्त अन्न अधिक प्रमाणात खाल्ले जाते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे साखरेवर नियंत्रण ठेवणे अवघड होते.

Winter and Diabetes

|

sakal

वारंवार शुगर तपासा

थंडीमुळे रक्तातील साखरेत चढ-उतार दिसू शकतो. त्यामुळे SMBG किंवा CGMSने मॉनिटरिंग जास्त करा.

Repeat Some Tests

|

sakal

औषधांचे रिव्ह्यू घ्या

रोजची रीडिंग सतत जास्त किंवा कमी असल्यास डॉक्टरांशी चर्चा करून औषधांची डोस/टायमिंग बदला.

Review Medicines

|

sakal

हिवाळ्यात आजारपणाचा धोका

हिवाळ्यात फ्लू, सर्दी आणि खोकल्याचा धोका वाढतो, त्यामुळे फ्लू आणि न्यूमोनीयाच्या लसीकरणाची काळजी घ्या.

Winter Diseases

|

sakal

घरी बसूनही सक्रिय राहा

जर तुम्हाला बाहेर जाऊन व्यायाम किंवा चालणे शक्य नसेल तर घरात योगा, स्टेप-अप्स, रेसिस्टन्स बँड, इनडोअर वॉकिंग करा. यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते.

Be Active at Home

|

sakal

सूर्यप्रकाशाचा फायदा घ्या

दुपारच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ चालल्याने किंवा बसल्याने व्हिटॅमिन D वाढते आणि मूड स्विंग्सही सुधारतात.

Have Adequate Sunlight Consumption

|

sakal

हिवाळ्यात पायांची विशेष काळजी

गर्म मोजे वापरा, पायांची नियमित तपासणी करा, भेगा आणि जखम टाळण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा (बोटांच्या मध्ये लावू नका). थंडीत त्वचा लवकर कोरडी होते, त्यामुळे विशेष काळजी घ्या.

Special Leg Care

|

sakal

हंगामी खाण्यावर भर द्या

बाजरी, हिरव्या पालेभाज्या, आवळा, लसूण, सुके मेवे हे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असून साखरेचे नियंत्रण करण्यास मदत करतात.

Focus on Seasonal Food

|

sakal

फेस्टिव्ह स्नॅक्सपासून सावध!

हिवाळ्यात विविध समारंभ होत असतात. अशा वेळी गोड पदार्थ, तुपाचे पदार्थ आणि तळलेले स्नॅक्स मर्यादेत खाणे आवश्यक आहे. हे पदार्थ शुगर अचानक वाढवू शकतात.

Snacks

|

sakal

हिवाळ्यातही दिसा 'फॅशन डिवा'! ट्राय करा स्कार्फ ड्रेपिंगचे ७ हटके लुक्स

Differernt Styles to Drape Scarf in Winter

|

sakal

आणखी वाचा