सकाळ वृत्तसेवा
लोक म्हणतात, 'दारू पिऊन खरं बाहेर येतं!' पण हे खरंच खरं असतं का? की फक्त विचार न करता बोलणं सुरू होतं?
दारू मेंदूवर परिणाम करते. निर्णय घेण्याची, विचार करण्याची आणि बोलण्याची प्रक्रिया बदलते.
दारू माणसाची 'इनहिबिशन्स' कमी करते – म्हणजेच, जो विचार तो बोलायला घाबरायचा त्याची भीती कमी होते.
दारू प्याल्यावर बोललेलं खरंही असू शकतं, पण ते अतिरंजितही असू शकतं. भावना आणि परिस्थितींचं भान राहत नाही.
दारूमुळे नातेसंबंध ताणतात. असंख्य वेळा, ज्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या त्या बोलल्या जातात – आणि भावना दुखावतात.
दारूचं व्यसन असेल तर, खोटं बोलणं, लपवाछपवी ही अधिक वाढते. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय – हे ओळखणं कठीण होतं.
दारू प्यायल्यावर काही वेळा मनातलं खरं बाहेर येतं – पण ते सगळं खरं नसतं. कारण त्यावेळी विवेकशक्ती मंदावलेली असते.
जर दारूमुळे नाती तुटत असतील, तर तज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन उपयुक्त ठरू शकतं.
खाण्याआधीच ओळखा आंबा गोड आहे की नाही? 'या' 5 ट्रिक्स वापरा!