घुबडाला खरंच दिवसा दिसत नाही का?

Shubham Banubakode

फक्त रात्रीच दिसतं?

घुबडाला फक्त रात्रीच दिसतं, असं अनेकांना वाटतं. पण खरं सांगायचं तर, घुबड दिवसा अंधळं नसतं; त्याला उजेडातही दिसू शकतं.

Owl Vision Facts

|

esakal

मोठे डोळे

घुबडाचे डोळे मोठे असतात. त्यामुळे कमी प्रकाशातही त्याला आजूबाजूच्या वस्तू दिसायला मदत होते आणि अंधारात शिकार शोधणं सोपं जातं.

Owl Vision Facts

|

esakal

डोळ्यांना त्रास

घुबडाला दिवसा दिसत असलं, तरी कडक सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अनेक घुबडं सावलीत बसून आराम करणं पसंत करतात.

Owl Vision Facts

|

esakal

संवेदनशील पेशी

घुबडाच्या डोळ्यांत रॉड सेल्स नावाच्या प्रकाशसंवेदनशील पेशी असतात. कमी उजेडात वस्तू दिसण्यासाठी या पेशी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Owl Vision Facts

|

esakal

कोन सेल्स

रंग ओळखण्यासाठी कोन सेल्स नावाच्या पेशी मदत करतात. घुबडांमध्ये या पेशी तुलनेने कमी असल्यामुळे त्यांची रंग ओळखण्याची क्षमता मर्यादित असते.

Owl Vision Facts

|

esakal

शिकार

कमी प्रकाशात दिसण्याची क्षमता घुबडाला रात्री शिकार करताना उपयोगी पडते. त्यामुळे अंधारातही आजूबाजूच्या हालचाली टिपून ते भक्ष्याचा शोध घेऊ शकतं.

Owl Vision Facts

|

esakal

वेळापत्रक

प्रत्येक घुबडाचं वेळापत्रक सारखं नसतं. काही प्रजाती दिवसा, तर काही सकाळी किंवा संध्याकाळी जास्त सक्रिय असतात आणि शिकारही करतात.

Owl Vision Facts

|

esakal

उजेडात शिकार

स्नोई घुबड आणि शॉर्ट-इअर्ड घुबड यांसारख्या काही प्रजाती दिवसा उजेडातही शिकार करतात. म्हणजेच, प्रत्येक घुबड दिवसभर झोपत नाही.

Owl Vision Facts

|

esakal

गर्भवती महिलांनी नवरात्रीचा उपवास करावा का? 

Can Pregnant Women Fast During Navratri

|

esakal

हेही वाचा -