गर्भवती महिलांनी नवरात्रीचा उपवास करावा का?

Shubham Banubakode

नऊ दिवस उपवास

नवरात्रीचे नऊ दिवस अनेक महिला उपवास करतात. पण गर्भवती महिलांनी उपवास करण्यापूर्वी स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्याचा विचार करणं गरजेचं आहे.

Can Pregnant Women Fast During Navratri

|

esakal

तज्ज्ञांचं मत

तज्ज्ञांच्या मते, गर्भावस्थेत सलग नऊ दिवस उपवास करणं प्रत्येक महिलेसाठी सुरक्षित असेलच असं नाही.

Can Pregnant Women Fast During Navratri

|

esakal

पुरेसं पोषण

गर्भावस्थेत आई आणि बाळाच्या वाढीसाठी पुरेसं पोषण आवश्यक असतं. त्यामुळे जेवण कमी करणं किंवा दीर्घकाळ उपाशी राहणं टाळावं.

Can Pregnant Women Fast During Navratri

|

esakal

आरोग्य महत्त्वाचं

उपवास करताना शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. पुरेसं पाणी पिणं आईची ऊर्जा आणि आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचं आहे.

Can Pregnant Women Fast During Navratri

|

esakal

स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला

उपवास करण्याची इच्छा असेल, तर आधी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. गर्भावस्थेची स्थिती आणि आरोग्य लक्षात घेऊनच निर्णय घ्या.

Can Pregnant Women Fast During Navratri

|

esakal

आहार

उपवास करत असाल, तर फळं, दूध, दही, पनीर आणि सुका मेवा यांसारखे पौष्टिक पदार्थ आहारात समाविष्ट करा.

Can Pregnant Women Fast During Navratri

|

esakal

लक्षणं

चक्कर येणं, अशक्तपणा, उलट्या, घाबरल्यासारखं वाटणं किंवा खूप थकवा जाणवल्यास उपवास सुरू ठेवू नका. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

Can Pregnant Women Fast During Navratri

|

esakal

वैद्यकीय सल्ला

धार्मिक श्रद्धा महत्त्वाची असली, तरी गर्भावस्थेत आई आणि बाळाचं आरोग्य सर्वात आधी येतं. उपवासापेक्षा योग्य आहार आणि वैद्यकीय सल्ल्याला प्राधान्य द्या.

Can Pregnant Women Fast During Navratri

|

esakal

हॉटेल रूममध्ये घड्याळ का नसते?

hotel 

|

esakal

हेही वाचा -