Payal Naik
आजकाल सगळ्या घरांमध्ये फोन आहेत. फोन आले म्हणजे त्यासोबत चार्जरही आला.
फोन चार्ज करून झाल्यावर अनेकजण चार्जरचं बटन तसंच सुरू ठेवतात.
त्यांच्या मते फोन चार्जरला लावलेला नाही त्यामुळे तो वीज वापरत नसेल.
पण खरंच चार्जर फोनला न लावता सुरू ठेवल्याने वीज वापरली जाऊन वीजबिल जास्त येतं का?
एका एकट्या फोन चार्जरचा तुमच्या मासिक वीज बिलावर होणारा परिणाम सहसा नगण्य असतो
फोन चार्जरसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सक्रियपणे चार्ज होत नसतानाही, थोडी वीज वापरतात.
म्हणजेच फोनला लावलेला नसतानाही चार्जर हा वीज वापरतो आणि त्याचं बिलदेखील येतं.
याला 'व्हॅम्पायर ड्रेन' किंवा 'फँटम लोड' असं म्हणतात. प्रत्येक चार्जरसाठी जरी ही वीज कमी असली तरी, कालांतराने ती जमा होत होत जास्त होते.
टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, गेमिंग कन्सोल, लॅपटॉप आणि अनेक चार्जर या वस्तूही वापरात नसताना सुरू ठेवल्या तरी त्या वीज वापरतात.
तुमचा फोन चार्जर कदाचित तुमच्या खिशाला मोठी झळ पोहोचवणार नसला तरी, ऊर्जा वापराबाबत जागरूक राहिल्याने तुमचा कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होते.
वारकऱ्यांचे हे घिबली स्टाईल फोटो पाहिलेत का? चिमुकला तयार कमालीचा गोड दिसतोय