मुंगसाला अंघोळ घालण्याचे खरंच फायदे असतात?

संतोष कानडे

सोशल मीडिया

सोशल मीडियावर सध्या मुंगसाला अंघोळ घातल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओ

या व्हिडीओमुळे मुंगसाला अंघोळ घातल्याने त्याला काही विशेष फायदे होतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्वच्छता

खरं तर मुंगूस हा नैसर्गिकरीत्या स्वतःच्या शरीराची स्वच्छता राखणारा प्राणी आहे.

धूळ आणि माती

तो आपल्या अंगावरील धूळ आणि माती काढण्यासाठी शरीर चाटतो तसेच जमिनीवर घासतो.

अंघोळ

त्यामुळे त्याला माणसांप्रमाणे नियमित साबणाने अंघोळ घालण्याची गरज नसते.

पुरावा

अंघोळ घातल्याने त्याच्या शरीरावरील घाण निघू शकते; मात्र त्यातून काही विशेष आरोग्यदायी फायदा होत असल्याचा ठोस पुरावा नाही.

शॅम्पू

वारंवार साबण किंवा शॅम्पू वापरल्यास त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होऊन त्वचेला त्रास होऊ शकतो.

स्पर्श

पाण्याची भीती, थंडी किंवा अनोळखी स्पर्शामुळे मुंगसाला ताणही येऊ शकतो.

मनोरंजन

त्यामुळे केवळ मनोरंजनासाठी किंवा व्हिडीओ बनवण्यासाठी मुंगसाला अंघोळ घालणे योग्य नाही.

नैसर्गिक अधिवासात

मुंगूस हा वन्यजीव असल्याने त्याला हाताळण्याऐवजी नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवणेच महत्त्वाचे आहे.

वाघ दिवसातून किती तास झोपतो?

<strong>येथे क्लिक करा</strong>