संतोष कानडे
वाघ हा जंगलातील सर्वात शक्तिशाली शिकारी प्राण्यांपैकी एक आहे; पण तो दिवसातील बराच वेळ विश्रांती घेतो.
वाघ साधारणपणे दिवसातून १६ ते २० तास विश्रांती घेतो, असं सांगितलं जातं. मात्र, हा वेळ प्रत्येक वाघासाठी सारखा नसतो.
वाघ प्रामुख्याने संध्याकाळी, रात्री आणि पहाटे अधिक सक्रिय असतो.
त्यामुळे दिवसा तो अनेकदा झाडांच्या सावलीत किंवा दाट झुडपांमध्ये आराम करतो.
शिकार करताना वाघाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागते.
ही ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी विश्रांती घेणं त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं.
उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठीही वाघ सावलीत किंवा पाण्याजवळ विश्रांती घेतो.
वाघ विश्रांती घेत असला, तरी आजूबाजूच्या हालचालींबाबत तो सतर्क राहू शकतो.
विशेष म्हणजे, वाघाच्या झोपेचा आणि विश्रांतीचा कालावधी त्याचं वय, वातावरण आणि उपलब्धतेनुसार बदलू शकतो.