मांजर आडवी गेल्याने खरंच अशुभ घडतं का?

Shubham Banubakode

मांजर आडवी जाणे

रस्त्यातून काळी मांजर आडवी गेली की काही जण थांबतात. पण मांजर दिसल्याने वाईट घडतं, याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

Does a Cat Crossing Your Path Bring Bad Luck

|

esakal

प्रवास

पूर्वी लोक रात्री बैलगाडी किंवा घोड्यावरून प्रवास करायचे. अचानक मांजर समोर आल्यास जनावरं घाबरून अपघात होण्याची शक्यता असायची.

Does a Cat Crossing Your Path Bring Bad Luck

|

esakal

व्यावहारिक विचार

मांजर समोरून गेल्यावर प्रवासी काही वेळ थांबायचे. जनावरं शांत व्हावीत आणि पुढचा प्रवास सुरक्षित व्हावा, हा त्यामागचा व्यावहारिक विचार होता.

Does a Cat Crossing Your Path Bring Bad Luck

|

esakal

अंधश्रद्धा

सुरक्षिततेसाठी घेतली जाणारी ही काळजी हळूहळू अंधश्रद्धेत बदलली. पुढे मांजर रस्ता ओलांडणं म्हणजे काहीतरी वाईट घडणार, अशी समजूत रूढ झाली.

Does a Cat Crossing Your Path Bring Bad Luck

|

esakal

आजाराचा धोका

पूर्वी प्लेगसारख्या आजारांची भीती होती. मांजरी उंदरांची शिकार करत असल्याने काही लोक त्यांना आजारांच्या धोक्याशी जोडू लागले होते.

Does a Cat Crossing Your Path Bring Bad Luck

|

esakal

अनुभव

मांजर दिसल्यानंतर काही वाईट घडलं, तर लोक त्याचा संबंध मांजरीशी जोडतात. मात्र काहीही वाईट न घडल्यास तो अनुभव सहज विसरतात.

Does a Cat Crossing Your Path Bring Bad Luck

|

esakal

काळी मांजर शुभ

भारतात काही जण काळी मांजर अशुभ मानतात. मात्र जपान, ब्रिटन आणि स्कॉटलंडमधील काही परंपरांमध्ये काळ्या मांजरीला शुभ मानलं जातं.

Does a Cat Crossing Your Path Bring Bad Luck

|

esakal

परिणाम

काळी मांजर रस्ता ओलांडते, तेव्हा ती फक्त तिच्या मार्गाने जात असते. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही; आपल्या कामावर त्याचा परिणाम होत नाही.

Does a Cat Crossing Your Path Bring Bad Luck

|

esakal

थंडीत दारू प्यायल्याने शरीर खरंच गरम होतं?

Drinking Alcohol in Winter

|

esakal

हेही वाचा -