Shubham Banubakode
थंडी वाजू लागली की काही जण उब मिळावी म्हणून दारूचा पेग घेतात. पण दारूमुळे शरीर खरंच गरम होतं का? तर यामागचं सत्य वेगळंच आहे.
Drinking Alcohol in Winter
esakal
दारू प्यायल्यानंतर त्वचेच्या जवळच्या रक्तवाहिन्या रुंद होतात. त्यामुळे त्वचेपर्यंत जास्त गरम रक्त पोहोचतं आणि आपल्याला शरीरात उब आल्यासारखं वाटतं.
Drinking Alcohol in Winter
esakal
दारूमुळे त्वचेपर्यंत आलेली उष्णता थंड हवेत लवकर बाहेर पडते. त्यामुळे वरून उब जाणवत असली, तरी शरीराचं अंतर्गत तापमान कमी होऊ शकतं.
Drinking Alcohol in Winter
esakal
दारूचा परिणाम मेंदूवरही होतो. त्यामुळे थंडी जाणवण्याची क्षमता कमी होऊ शकते. अशावेळी शरीर थंड पडत असलं, तरी आपल्याला त्याचा अंदाज येत नाही.
Drinking Alcohol in Winter
esakal
शरीराचं अंतर्गत तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेलं, तर हायपोथर्मिया होऊ शकतो. ही गंभीर स्थिती असून वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
Drinking Alcohol in Winter
esakal
दारू पिऊन बाहेर झोपणारे, ज्येष्ठ नागरिक, कमी वजन असलेले तसंच हृदय किंवा रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना थंडीत अधिक धोका असू शकतो.
Drinking Alcohol in Winter
esakal
दारूमुळे लघवीचं प्रमाण वाढू शकतं आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. शिवाय नशेत तोल जाऊन पडणं किंवा दुखापत होण्याचा धोकाही वाढतो.
Drinking Alcohol in Winter
esakal
थंडीत उबदार कपडे घाला आणि सुरक्षित ठिकाणी राहा. एखादी व्यक्ती खूप सुस्त झाली किंवा गोंधळल्यासारखी वागू लागली, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Drinking Alcohol in Winter
esakal
वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
Drinking Alcohol in Winter
esakal
Sri Lanka Dussehra
esakal