Mansi Khambe
सफरचंद कापल्यानंतर काही वेळाने ते काळं पडल्याचे दिसून येते. कापलेल्या फळांचां बदलेला रंग किंवा ते काळे पडल्याने ते खाण्यासही अनेकजण टाळतात.
कारण म्हणजे सफरचंद कापल्यावर त्यांचा संपर्क हवेतील ऑक्सिजनशी येतो. यामुळे फळांमधील एंझाईम सक्रिय होतात आणि ऑक्सिडीकरण प्रक्रिया सुरू होते. यामुळे फळांचा रंग बदलतो.
कापलेलं सफरचंद काळ पडणार नाही, अशा काही टिप्स जाणून घ्या. ज्यांच्या मदतीने तुम्ही सफरचंद काळा पडण्यापासून बचाव करु शकता.
तुम्ही कापलेल्या सफरचंदवर लिंबाचा रस किंवा संत्र्याचा रस टाकू शकता. याने फळ काळं पडणार नाही.
सोडियम क्लोराईड आणखी एक केमिकल आहे जे ऑक्सिडेशनची प्रक्रिया रोखण्यास काम करतं. अशात कापलेला सफरचंद मिठाच्या पाण्यात काही वेळासाठी टाकून ठेवा. त्यानंतर त्याला काढून साध्या पाण्याने धुवून घ्या.
सफरचंद किंवा कोणतेही फळ कापून लगेच खाणार नसाल तर यावर तुम्ही रबर बॅंड ट्रिक वापरु शकता. यासाठी तुम्हाला सफरचंदच्या फोडी कराव्या लागतील आणि त्यांच्या चारही बाजूंनी टाईट रबर बॅंड बांधा जेणेकरुन कापलेल्या फोडींना हवा लागणार नाही.
कापलेले सफरचंद हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. त्यामुळे, हवेचा संपर्क कमी होऊन, ऑक्सिडीकरण कमी होते.
सफरचंद कापल्यानंतर त्यांना थंड ठिकाणी ठेवल्यास, ऑक्सिडीकरण होण्याची प्रक्रिया मंदावते.