Shubham Banubakode
भारतात दसऱ्याला रामलीला सादर केली जाते. भगवान रामांच्या विजयाची आठवण म्हणून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं.
Sri Lanka Dussehra
esakal
श्रीलंकेतही काही हिंदू दसरा साजरा करतात. मात्र, भारतात जसं रावणाचं दहन केलं जातं, तशी परंपरा तिथे सर्वसाधारणपणे दिसत नाही.
Sri Lanka Dussehra
esakal
श्रीलंकेतील काही स्थानिक मान्यतांनुसार रावणाला प्राचीन लंकेचा शक्तिशाली राजा, पराक्रमी योद्धा आणि विद्वान म्हणून पाहिलं जातं.
Sri Lanka Dussehra
esakal
श्रीलंकेत रावणाची मिरवणूक निघते. मात्र, ती दसऱ्याला नसून मार्च महिन्यात आयोजित केली जाते.
Sri Lanka Dussehra
esakal
या मिरवणुकीला मेदिन महा पेराहेरा म्हणतात. यात रावणाची प्रतिमा हत्तीवर ठेवून मिरवणूक काढली जाते, अशी परंपरा आहे.
Sri Lanka Dussehra
esakal
या आयोजनात सजवलेले हत्ती, पारंपरिक नृत्य आणि धार्मिक विधी पाहायला मिळतात.
Sri Lanka Dussehra
esakal
श्रीलंकेत या कार्यक्रमाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
Sri Lanka Dussehra
esakal
श्रीलंकेतील कोलंबोजवळच्या पन्निपिटिया भागातील श्री देव्रम विहार मंदिरातून ही मिरवणूक काढली जाते. दरवर्षी मार्चमध्ये या मिरवणुकीचं आयोजन होतं.
Sri Lanka Dussehra
esakal
Handwriting Changes
esakal